Vijayapura

विजापूरमध्ये उद्या काँग्रेसची प्रचार कार्यशाळा

Share

विजापूरमध्ये उद्या, १५ मार्च रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष मल्लिकांर्जुन लोणी यांनी केले आहे.

विजापूर शहरात रविवारी काँग्रेस पक्षाच्या प्रचार समितीच्या वतीने ही एकदिवसीय कार्यशाळा पार पडणार असल्याचे मल्लिकांर्जुन लोणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या कार्यशाळेचे नेतृत्व माजी मंत्री विनय कुमार सोरके करणार असून, राज्याचे मंत्री एम. बी. पाटील, शिवानंद पाटील यांच्यासह बागलकोटचे आमदार आणि इतर महत्त्वाचे मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आगामी काळातील पक्षाची रणनीती आणि सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमाला विजापूर आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मल्लिकांर्जुन लोणी यांनी केले आहे.

Tags: