hubbali

हुबळीत गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचे अनोखे आंदोलन

Share

हुबळीमध्ये ऑटो एलपीजी गॅसच्या दरात झालेल्या भरमसाठ दरवाढीचा निषेध करण्यासाठी रिक्षाचालकांनी गॅस सिलिंडरची पूजा करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

हुबळीमधील चन्नम्मा चौकात एकत्र येत रिक्षाचालकांनी गॅस दरवाढीविरोधात निदर्शने केली. ऑटो एलपीजी गॅस उपलब्ध असतानाही गॅस स्टेशन मालक त्याचा अवैध साठा करत आहेत. गॅस मालकांनी मनमानीपणे दरांमध्ये वाढ केली असून, ६० रुपयांवरून थेट ८० रुपयांपर्यंत दर नेले आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.

एलपीजी गॅसच्या दरात प्रति किलोमागे अवैध पद्धतीने वाढ करण्यात आल्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सरकार आणि प्रशासनाने या साठेबाजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रिक्षाचालकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. या मनमानी कारभारावर तातडीने लगाम लावावा, अशी मागणी हुबळीमधील रिक्षाचालकांनी केली आहे.

Tags: