विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडीजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.


कागवाड येथून श्रीशैलमच्या दिशेने निघालेली कार उलटल्याने ही दुर्घटना घडली असून दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. कागवाड येथून श्रीशैलमला जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी शहरात असलेल्या बसवन हट्टी क्रॉसजवळ बिज्जळ राज्य महामार्गावर कार उलटली. या अपघातात चंद्रव्वा टक्केन्नवर (७०) आणि कामप्पा आवरादी (६५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे गुरुशांत दाश्याळ यांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच बसवन बागेवाडीचे पोलीस निरीक्षक गुरुशांत दाश्याळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही घटना बसवन बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुरुशांत दाश्याळ यांनी दिली.


Recent Comments