Nippani

निपाणीत काँग्रेसला खिंडार; शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची विकासकामे आणि निपाणी मतदारसंघात आमदार शशिकला जोल्ले यांनी राबविलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून, भीमापूरवाडी गावातील २० हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भीमापूरवाडीतील सतीश कोंडेकर, विशाल सूर्यवंशी, उदय बेळेकर, तुषार कोंडेकर, केदार सूर्यवंशी, कुबेर कोंडेकर, रोहन चव्हाण, प्रथमेश बेळेकर, उदय कोंडेकर, रणजित कोंडेकर, अजित कोंडेकर, गणेश मोरे, प्रकाश साळुंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात उत्साहात स्वागत केले.

यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, सिद्धू नराटे, हालशुगरचे संचालक श्रीकांत बन्ने, भरत नसलापुरे, बाळासाहेब सदलगे, मिथुन पाटील, अरुण बिलवाडे, बाबासाहेब जाधव, अलगोंडा पाटील, भरत घोसखाडे, रेखा घोसखाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: