राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी जोर धरू लागली असून रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी हायकामांडवर दबाव टाकण्याची तयारी दर्शवली आहे. काही मंत्री उपलब्ध होत नसल्याची तक्रार करत त्यांनी तातडीने फेरबदलाची मागणी केली असून यासाठी आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे.

राज्यातील काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांमध्ये नाराजी असून अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी अशोक पट्टण यांनी केली आहे. सध्या ३ वर्षे पूर्ण होत आली असून ३४ मंत्र्यांपैकी किमान २२ जणांना बदलून नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असे अशोक पट्टण यांनी म्हटले.
आमच्या मागण्या मांडण्यासाठी मार्च २६ रोजी २५ ते ३० आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट घेणार असल्याची माहिती अशोक पट्टण यांनी दिली.


Recent Comments