Dharwad

धारवाडमध्ये १३ आणि १४ मार्चला रंगणार जंगी निकाली कुस्ती स्पर्धा

Share

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘धारवाड खासदार क्रीडा महोत्सवा’चा भाग म्हणून १३ आणि १४ मार्च रोजी धारवाडमधील के.सी.डी. मैदानावर वजन गट आणि जंगी निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ उपक्रमांमुळे आज संपूर्ण देशाला तंदुरुस्तीचे महत्त्व पटले आहे, असे अमृत देसाई यांनी म्हटले.

खासदार प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली ‘धारवाड खासदार क्रीडा महोत्सव २०२५-२६’ अत्यंत यशस्वीपणे पार पडला असून, या महोत्सवात ३१ हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे हे विशेष आहे. १३ आणि १४ मार्च रोजी कर्नाटक कॉलेजच्या (केसीडी) मैदानावर कुस्तीच्या लढती होतील. या महोत्सवात देशातील प्रतिष्ठित पैलवानांसह आपल्या लोकसभा मतदारसंघातील मल्लही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असे अमृत देसाई यांनी सांगितले.

Tags: