बेळगावमधील बसवण कुडची येथील चन्नम्मा बसवंतय्या हिरेमठ वृद्धाश्रमात सर्वलोक सेवा फाउंडेशन आणि कर्नाटक पोलीस दलाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

केएसआरपी कॅम्पसमधील श्री दुर्गामाता मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या साड्यांचे वाटप वृद्धाश्रमातील माता आणि भगिनींना करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे २५० महिलांनी घेतला. याच सोहळ्यात महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी वीरेश हिरेमठ, मल्लाप्पा गुराई, सुभाष मुरकुटे, विश्वनाथ कुरपी, बसवराज मडीवाळ, एम. एस. चौगला, गौरीश हिरेमठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments