राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशिक्षणार्थींच्या शिष्यवृत्तीवरून तसेच प्रशिक्षण संस्थांमधील सरकारी धोरणावर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सडकून टीका केली.

राज्यातील सरकारी संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणात एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांना निवास व शिष्यवृत्ती नाकारली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला असून, अल्पसंख्याक विभागाच्या धर्तीवर सर्वच विद्यार्थ्यांना समान न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः कल्याण कर्नाटक भागातील १०० आयएएस व ४०० केएएस उमेदवारांसाठी असलेल्या प्रशिक्षण योजनेत सरकार आणि प्रशासकीय पातळीवर ताळमेळ नसल्याने जिल्हाधिकारी मनमानी करत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. अल्पसंख्याक विभागाच्या विद्यार्थ्यांना १२ महिने निवास आणि ६ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते, मग हाच न्याय मागासवर्गीय विद्यार्थ्यांना का नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या दुजाभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


Recent Comments