Vijayapura

चालकाचे नियंत्रण सुटून मालवाहू ट्रक कोसळला दरीत ; चालक गंभीर जखमी

Share

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सिमेंटने भरलेला ट्रक रस्ता सोडून थेट दरीत कोसळल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कलकुर्गीहून विजापूरच्या दिशेने सिमेंट घेऊन येत होता. सिंदगी शहराच्या बाहेरील भागात येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले.

गंभीर जखमी झालेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Tags: