Dharwad

धारवाडमध्ये गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Share

धारवाडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सिलिंडर दरवाढीचा तीव्र निषेध केला असून वाढलेले दर तातडीने कमी करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेस समितीच्या धारवाड ग्रामीण जिल्हा घटकाच्या नेतृत्वाखाली शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

इस्रायल, अमेरिका आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा दावा केला जात असला तरी, यामध्ये केंद्र सरकारचे स्पष्ट दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यातच आता सिलिंडरच्या दरात अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गीय जनतेचे जगणे कठीण झाले असून केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारने तात्काळ दरवाढ नियंत्रणात आणून सिलिंडरचे वाढलेले दर मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात युवा काँग्रेस समितीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Tags: