हुबळीतील चिटगुप्पी रुग्णालयातील डॉक्टरांनी २.३ किलोची दुर्मिळ गाठ यशस्वीपणे काढून एका महिलेसह इतर चार महिलांना जीवदान दिले आहे. या क्लिष्ट शस्त्रक्रियेमुळे या महिलांची अनेक वर्षांच्या त्रासातून सुटका झाली आहे.


मूळची मुंबईची असलेली एक महिला पोटातील गाठीमुळे अत्यंत त्रासात होती. तिने हुबळी येथील चिटगुप्पी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर दंडेप्पनवर यांची भेट घेऊन उपचार सुरू केले. तपासणीअंती महिलेच्या पोटात मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेत तब्बल २.३ किलो वजनाची गाठ बाहेर काढली. याचप्रमाणे आणखी चार महिलांच्या कॅन्सरच्या गाठींवर यशस्वी शस्त्रक्रिया करून एकूण पाच महिलांचे प्राण वाचवले आहेत.

या यशाबद्दल माहिती देताना चिटगुप्पी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर दंडेप्पनवर यांनी सांगितले की, चिटगुप्पी रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. येथे सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून आतापर्यंत अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
हुबळीतील या रुग्णालयात डॉ. श्रीधर दंडेप्पनवर यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियांमध्ये रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.


Recent Comments