कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रातील हंदिनूर गावात होणाऱ्या लक्ष्मी यात्रेसाठी आज केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्याहस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली.


बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी आणि युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार, केपीसीसी सदस्य मल्लागौडा पाटील यांनी हंदिनूर गावातील लक्ष्मी यात्रेची मुहूर्तमेढ रोवली. यात्रेनिमित्त आयोजित मुहूर्तमेढ कार्यक्रमाला त्यांनी विशेष उपस्थिती लावली.

यावेळी मल्लगौडा पाटील यांनी जारकीहोळी परिवाराच्या वतीने यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीच्या माध्यमातून मंडपाच्या ठिकाणी मान्यवरांसह ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मुहूर्तमेढ विधी पार पाडला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने मलगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments