बेळगावच्या केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील मनिपाल रेवेल्स कप २०२६ आणि राज्यस्तरीय बेस्ट फिजिक स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

संस्थेच्या जलतरणपटूंनी मनिपाल येथे झालेल्या राष्ट्रीय महोत्सवात अनेक वैयक्तिक आणि सांघिक पदके पटकावून कॉलेजचे नाव उज्ज्वल केले. जलतरण स्पर्धेत क्रिझाना इराणी हिने बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय प्रकारात तब्बल ६ सुवर्णपदके जिंकली. अजिंक्य सुंगर याने ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदक, तर स्वयं कारेकर याने ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदकावर आपले नाव कोरले. रिया हेरेकर हिने ४ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. तसेच यश हवलानचे याने सुवर्ण आणि अनुज याने दोन कांस्य व एक सुवर्ण पदक पटकावून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
क्रीडा क्षेत्रातील या यशासोबतच ओम विजय पाटील याने केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या इन्व्हेंटो मसल मोनार्क या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश मिळवले.
या सर्व विजेत्यांचे केएलएस गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजेंद्र बेळगामकर, आर बी भंडारे, यू एन कलकुंद्रीकर, प्राचार्य डॉक्टर एम एस पाटील आणि प्राध्यापक दिगंबर कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर डॉक्टर जॉर्ज रॉड्रिग्स आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.


Recent Comments