Belagavi

धारवाडच्या ‘मीडिया फेस्ट’मध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाचा डंका

Share

धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठात आयोजित ‘मीडिया फेस्ट २०२६’ मध्ये बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

या महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आरसीयूच्या संघाने ‘समग्र विजेतेपद’ आपल्या नावे केले. विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये प्रीती माळवदे हिने मुलाखत स्पर्धेत, प्रताप मसाली याने रील्स मेकिंगमध्ये, तर मल्लिका़र्जुन हंजनट्टी याने स्क्रिप्ट रायटिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सिद्धेश्वर याने रेडिओ जॉकी स्पर्धेत द्वितीय आणि मल्लिका़र्जुनने मुलाखत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या यशाबद्दल कुलगुरू प्राध्यापक एम. त्यागराजा, कुलसचिव संतोष कामगौडा आणि विभाग प्रमुख डॉक्टर पूजा हळ्ळ्याळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राध्यापक विद्याश्री हालकेरीमठ, आदित्य यलीगार आणि रमेश बागोजी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

Tags: