विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत हॉटेलमधील मोठ्या प्रमाणावर साहित्याचे नुकसान झाले आहे.


विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात असणाऱ्या रेल्वे रोडवरील पंचरत्न हॉटेलमध्ये ही आग लागली. मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे हॉटेलमधील फर्निचर आणि अन्य महागड्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. या दुर्घटनेत हॉटेलमधील लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. ही घटना इंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments