वीरराणी बेळवडी मल्लम्मा यांचे शौर्य जपण्यासाठी बैलहोंगलमध्ये विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आमदार महांतेश कौजलगी यांनी महसूल मंत्री कृष्णा बायरेगौडा यांची भेट घेऊन यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

बैलहोंगल मतदारसंघातील ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आमदार महांतेश कौजलगी यांनी विधानसभा अधिवेशनात वीरराणी बेळवडी मल्लम्मा यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. याचाच भाग म्हणून त्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन मल्लम्मा यांच्या ऐक्य स्थळाचा ऐतिहासिक स्मारक म्हणून विकास करण्याची विनंती केली. मल्लम्मा यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे असल्याचे महांतेश कौजलगी यांनी म्हटले.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री कृष्णा बायरेगौडा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच या प्रतिष्ठानची घोषणा केली आहे. या परिसराचा पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून विकास करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाईल. वीरराणीचा इतिहास जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही कृष्णा बैरेगौडा यांनी दिली.


Recent Comments