Belagavi

बेळगावच्या माहेश्वरी अंधशाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Share

जागतिक महिला दिनानिमित्त बेळगाव येथील माहेश्वरी अंध शाळेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

महिला व बालविकास विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक चेतनकुमार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता आणि बालकांचे संरक्षण या विषयांवर प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात साधनव्यक्ती म्हणून उपस्थित असलेल्या सुरेखा पाटील आणि मल्लेश कुंदरगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरण, महिला व बालकांचे संरक्षण, कायदेशीर जनजागृती आणि सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती सुरेखा पाटील आणि मल्लेश कुंदरगी यांनी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा प्रकल्प अधिकारी अन्नप्पा हेगडे, जिल्हा महिला कल्याण अधिकारी कांचना आमटे, बेळगाव शहराचे बालविकास प्रकल्प अधिकारी राममूर्ती आणि बेळगाव ग्रामीणच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुमित्रा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: