निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आवारात जोल्ले दांपत्याच्या मार्गदर्शनाखाली ११ मार्चपासून सहा दिवसीय भव्य कृषी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जोल्ले समूहाचे उपाध्यक्ष बसव प्रसाद जोल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली.


येत्या ११ मार्च रोजी कणेरी सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सान्निध्यात या उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी ढोल स्पर्धा, कोल्हापूरच्या भजन रॉक संघाचे आधुनिक भजन आणि बेंगळुरूच्या सायकीक सिबलिंग्स वतीने सादरीकरण होणार असल्याची माहिती बसव प्रसाद जोल्ले यांनी दिली. १२ मार्च रोजी ऊस शेतीवर कार्यशाळा आणि मर्दानी खेळांच्या स्पर्धांचा थरार रंगणार आहे.

या उत्सवात १३ मार्च रोजी आधुनिक ऊस शेतीवर व्याख्यान आणि श्वान स्पर्धा आयोजित केल्या आहेत. १४ मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी ‘अॅग्री फायनान्स’ सेमिनार, तर १५ मार्च रोजी कृषी पंडितांचे मार्गदर्शन आणि लावणी नृत्याचा कार्यक्रम होईल. १६ मार्च रोजी मेंढ्यांच्या झुंजी आणि गोव्याच्या बँड पथकाच्या सादरीकरणाने या उत्सवाची सांगता होईल, असे बसव प्रसाद जोल्ले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक जयकुमार खोत, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, समित सासने, सुनील पाटील, रावसाहेब फराळे, रमेश पाटील, सुहास गुगे, प्रवीण शिंदे, विजय राऊत, व्यवस्थापकीय संचालक आप्पासाहेब शिरगावे आणि गजानन रामनकट्टी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments