बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गावाबाहेर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे.

मुधोळ-जमखंडी राज्य महामार्गावरील शिरोळ गावाजवळील कालव्याजवळ ही दुर्घटना घडली. वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींचे नियंत्रण सुटल्याने त्यांची एकमेकांना जोराची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याच्या प्रकृतीची चिंताजनक आहे. अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते.
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिका आणि मुधोळ पोलिसांना माहिती दिली. जखमीला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुधोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


Recent Comments