मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे, असे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.

या अर्थसंकल्पात बेळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेला अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि राज्याच्या विकासाला गती देणारा असल्याचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात बेळगाव जिल्ह्याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्वांना समान संधी आणि न्याय देण्याच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो जनसामान्यांच्या काळजीतून निर्माण झालेला एक उत्तम आणि आश्वासक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया प्रियांका जारकीहोळी यांनी दिली आहे.


Recent Comments