चिकोडी तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिराचा नूतन गोपूर महाकुंभाभिषेक सोहळा अत्यंत थाटात साजरा झाला. या धार्मिक सोहळ्यासाठी ५ हजारांहून अधिक महिलांनी कुंभ घेऊन सहभाग नोंदवला होता.


नूतन गोपुरावर कलश प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे विशेष सान्निध्य लाभले होते. या मंगल समयी हजारो महिलांनी कृष्णा नदीतून पवित्र जल आणून कुंभाद्वारे गोपुरावर अभिषेक केला. या अभूतपूर्व सोहळ्याने संपूर्ण येडूर क्षेत्र भक्तीमय झाले होते.

या महाकुंभाभिषेक सोहळ्यात काशी जगद्गुरू, उज्जैनी जगद्गुरूंसह विविध मठांचे मठाधीश उपस्थित होते. अबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला. मंदिराच्या नूतन गोपुरावर कुंभाद्वारे पाणी ओतून भक्तांनी मनोभावे दर्शन घेतल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली.


Recent Comments