Belagavi

विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक : डॉ. प्रभाकर कोरे

Share

राज्यातील सिद्धरामय्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असून, गॅरंटी योजनांच्या गराड्यात सरकारने जनतेला केवळ आश्वासनेच दिली आहेत अशी टीका केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केली आहे.

विकासाच्या प्रक्रियेत राज्याला पुढे नेण्याऐवजी, केवळ गॅरंटी योजनांच्या ओझ्याखाली राज्याला कर्जाच्या विळख्यात अडकवण्याचे काम या सरकारने केले आहे. . कृषी, आरोग्य, सहकार आणि सिंचन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत क्षेत्रांना डावलून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले असून, हा अर्थसंकल्प विकासाला खीळ घालणारा आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केली.

Tags: