खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी पुद्दुचेरी दौऱ्यावर असताना राजभवन विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला.

एआयसीसी सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्याकडे पुद्दुचेरीच्या प्रभारीपदाची जबाबदारी असल्याने त्यांनी राजभवन ब्लॉक काँग्रेस समितीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी बूथ क्रमांक १९ मधील महिलांची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच मागील काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती देऊन भाजप सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून दिले.
यावेळी आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. या बैठकीला डीसीसी प्रभारी वेलमुरुगन, डॉक्टर विजयकुमारी, युवक काँग्रेस प्रभारी कपिल, सुरेंद्र यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments