अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध उद्योजक आनंद संकेश्वर यांच्यासह ७० भारतीय उद्योजक दुबईहून हुबळीत सुखरूप परतले आहेत.

आनंद संकेश्वर यांनी स्वखर्चाने विशेष विमानाची व्यवस्था करून या ७० सहकाऱ्यांना मायदेशी आणले. दुबईतील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय दूतावासाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप या उद्योजकांनी हुबळीत पोहोचल्यानंतर केला आहे.
या युद्धाच्या भीषण अनुभवावर बोलताना आनंद संकेश्वर यांनी प्रशासकीय अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. आमच्या समोरच क्षेपणास्त्र हल्ले झाले असून अत्यंत दहशतीच्या वातावरणात आम्ही काळ व्यतीत केला आहे. इतर देशांनी त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली, मात्र भारतीय नागरिकांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागली, अशी प्रतिक्रिया आनंद संकेश्वर यांनी दिली आहे.


Recent Comments