Chikkodi

विजयेंद्र यांच्या टीकेला डी.के. शिवकुमार यांचे चोख प्रत्युत्तर

Share

चिक्कोडी येथील येडूरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या मार्गात शेजारील राज्यांकडून येणाऱ्या अडथळ्यांवर जोरदार प्रहार करत काँग्रेस सरकारला ‘नालायक’ म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला.

आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विषयात आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र अडथळे निर्माण करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. राज्यातील सिंचन हक्कांच्या रक्षणासाठी राज्य सरकार आता दिल्ली दरबारी लढा देण्यास सज्ज झाले आहे. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही ७० हजार कोटी रुपये खर्च करून जमीन संपादनाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून, शेजारील राज्यांनी आपल्यावर होणारा अन्याय थांबवावा, असे डी.के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. या प्रश्नी दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावून पंतप्रधानांवर दबाव आणला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेस सरकारला ‘नालायक’ म्हणणाऱ्या बी.वाय. विजयेंद्र यांना प्रत्युत्तर देताना डी.के. शिवकुमार यांनी सडेतोड भूमिका मांडली. भाजपचे सरकार ‘नालायक’ होते म्हणूनच जनतेने आता ‘लायक’ सरकारला सत्तेवर आणले आहे, अशा शब्दांत त्यांनी विजयेंद्र यांना टोला लगावला. विजयेंद्र यांच्याकडे केवळ टीका करण्याशिवाय दुसरे काहीही काम उरलेले नाही, अशी टीका करत कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या हिताचा बळी दिला जाणार नाही, असे डी.के. शिवकुमार यांनी येडूरमध्ये स्पष्ट केले.

Tags: