Khanapur

खानापूर-जांबोटी रस्त्यावर धावत्या दुचाकीवर कोसळले झाड; तरुण थोडक्यात बचावला

Share

खानापूर-जांबोटी या मुख्य रस्त्यावर शनया गार्डनजवळ धावत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

विनायक पाटील (रा. बरगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून, या अपघातात त्याच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या, विशेषतः एसीएफ सुनीता निंबरगी यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

जांबोटी रस्ता हा पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या वर्दळीचा मुख्य मार्ग आहे. असे असतानाही रस्त्याशेजारील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ‘इन न्यूज’ने अलीकडेच हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीतील वाळलेल्या आंबा झाडाबाबत बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबरगी यांनी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात अशा जीवघेण्या झाडांचा बंदोबस्त करण्याऐवजी केवळ कार्यालयात बसून राहण्याला पसंती दिल्याची टीका होत आहे.

खानापूर-हळियाळ आणि जांबोटी रस्त्यावर अनेक जुनी झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरून या झाडांची पाहणी करणे आणि ती हटवणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाच्या या ‘दिव्य’ दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. आता तरी सुनीता निंबरगी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: