Belagavi

सुरेश यादव फाऊंडेशनतर्फे रंगपंचमीनिमित्त कार्यक्रम

Share

बेळगावातील रामतीर्थ नगर येथे सुरेश यादव फाऊंडेशनतर्फे रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.

होळी हा सण केवळ रंगांचा नसून तो आध्यात्मिक विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, असे मत सुरेश यादव यांनी व्यक्त केले. हा सण जाती-पातीचे सर्व भेद विसरून सर्वांना एकत्र आणतो आणि समाजात आनंदाचे वातावरण निर्माण करतो, अशी प्रतिक्रिया सुरेश यादव यांनी दिली.

होळीच्या दिवशी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण उत्साहात सहभागी होतात. परंपरेनुसार कामदेवाची मूर्ती सजवून तिचे पूजन केले जाते आणि एकमेकांवर रंगांची उधळण करत हा आनंद साजरा केला जातो, असे मुख्तार पठाण यांनी म्हटले.

हा सण कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एकत्र आणणारा असून सुरेश यादव फाऊंडेशनने केलेले हे आयोजन कौतुकास्पद असल्याचे गुरुपुत्रप्पा तोरगल यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महिला आणि पुरुषांसाठी रंग खेळण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अशोक धरीगौडर, नानीगौडा बिरादार, मारुती भास्कर, राजीव पाटील, राजेश शिंद्रे, संगीता गुणकी, पूर्णिमा यादव यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: