बागलकोट जिल्ह्यातील मुधोळमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुधोळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील मंटूर क्रॉसजवळ पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने नागरिकांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. पैसे दीडपट किंवा दुप्पट करून देण्याचे आश्वासन देऊन बनावट नोटांच्या माध्यमातून ही टोळी फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी दादू चव्हाण, कृष्णा पवार, दुंडप्पा ओणशणवी, गुडुसाब नदाफ, दानेश भजंत्री आणि दिनकर या सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
काल रात्री जमखंडी पासिंग असलेल्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० कारमधून पैसे नेले जात असताना संशयावरून मंटूर क्रॉसजवळ कारवर दगडफेक करण्यात आली. पैसे गमावलेल्या पीडितांनी फसवणूक करणाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करून ही दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एका व्यक्तीला ताब्यात घेतले असता या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला. या धंद्यामागे नेमके कोण आहेत आणि फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी म्हटले आहे. जप्त करण्यात आलेले वाहन दुंडप्पा ओणशणवी यांच्या नावावर असून पोलिसांनी तपास चक्रावेगवान केली आहेत.


Recent Comments