Vijayapura

विजापूर रेल्वे स्थानकाजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Share

विजापूर शहरातील इब्राहिमपूर रेल्वे रुळावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

रेल्वे रुळावर मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सदर व्यक्तीचा मृत्यू ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. ही घटना विजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

Tags: