विजापूर शहरात असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आज अत्यंत कुजलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या, याचा उलगडा पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. ही घटना गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस मृताची ओळख पटवण्यासोबतच अधिक तपास करत आहेत.


Recent Comments