hubbali

हुबळी : पोहायला गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Share

हुबळी येथील अंचटगेरी मोठ्या तलावात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हुबळीतील आनंदनगर, गोडके प्लॉट येथील रहिवासी असलेला रिहान असे मृत तरुणाचे नाव आहे.

वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे रिहान आपल्या मित्रांसोबत अंचटगेरी येथील मोठ्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल खड्ड्यात अडकला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: