बेळगावमधील खानापूर रोडवर तिसऱ्या रेल्वे गेटजवळ नूतन बांधण्यात आलेल्या ‘हायटेक डिलाईट’ लॉजिंग आणि शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटचे रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.


अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या वास्तूमुळे बेळगावच्या हॉटेल व्यवसायात एक नवी भर पडली आहे. गेल्या १५ वर्षांपासून जाहिरात आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या हायटेक समूहाने आता हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून हायटेक समूहाच्या या नवीन व्यवसायाचे उद्घाटन केले. येथील प्रशस्त खोल्या आणि आधुनिक सुविधा ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.

बेळगाव शहराचा विस्तार झपाट्याने होत असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांतून हजारो लोक दररोज शहरात येतात. त्यांच्या निवासासाठी ‘हायटेक डिलाईट’ने ही नाविन्यपूर्ण वास्तू उभारली आहे. तरुणांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनून इतरांनाही रोजगार द्यावा, असे आशीर्वाद कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी दिले.

हायटेक ग्रुपने सुरू केलेले ‘हायटेक डिलाईट’ आगामी काळात शहराचा मानबिंदू ठरेल. दक्षिण भागात उद्यमनगर आणि औद्योगिक क्षेत्र असल्याने बाहेरून कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी ही जागा अत्यंत सोयीची आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले.

ग्राहकांच्या प्रेमामुळेच हायटेक ग्रुपने १५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आता नव्या पावलांतर्गत २५ खोल्यांचे लॉजिंग आणि संपूर्ण शाकाहारी रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. बेळगाव-गोवा आणि खानापूर रोडवर हे हॉटेल असल्याने तीनही राज्यांतील प्रवाशांची सोय होईल, अशी माहिती संचालक राजेश भोसगी यांनी दिली.
समूहाच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त ही नवीन सेवा सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल, असे मत विनयकुमार बाळिकायी यांनी व्यक्त केले.
हायटेक ग्रुपने आता हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश केला असून त्यांना या क्षेत्रातही यश मिळेल. टीव्हीएस आर.टी. एक्स (TVS RT X) या नवीन दुचाकीचा पहिला ग्राहक होताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया कुलदीप हंगीरगेकर यांनी दिली.
हायटेक डिलाईटच्या माध्यमातून सुमारे २५ एसी रूम्स आणि कॉन्फरन्स हॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीमा भागातील पर्यटक आणि उद्योजकांच्या पसंतीस हे हॉटेल नक्कीच उतरेल, असा विश्वास संचालक राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात टीव्हीएस आर.टी. एक्स दुचाकीचे अनावरणही करण्यात आले. या गाडीच्या नवीन फीचर्समुळे प्रभावित होऊन अनेक ग्राहकांनी बुकिंग केले असून, पहिल्या सहा ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते गाड्यांची डिलिव्हरी देण्यात आली. याप्रसंगी संचालक बसवराज तंगडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments