Belagavi

बेळगावात ‘हायटेक डिलाइट’चे थाटात उद्घाटन

Share

बेळगावमधील खानापूर रोडवरील तिसऱ्या रेल्वे गेटजवळ सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या ‘हायटेक डिलाइट’ लॉजिंग आणि शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटचे रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

गेल्या १५ वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या हायटेक समूहाने आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले असून, अत्याधुनिक सोयींमुळे हे हॉटेल आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून हायटेक समूहाच्या या नवीन व्यवसायाचे उद्घाटन केले.

गेल्या १५ वर्षांपासून जाहिरात आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर हायटेक समूहाने आता आदरातिथ्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. येथे ग्राहकांसाठी २५ वातानुकूलित (AC) खोल्या आणि प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संचालक बसवराज तंगडी यांनी दिली.

बेळगाव शहराचा विस्तार झपाट्याने होत असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील हजारो लोक दररोज येथे येतात. त्यांच्या निवासासाठी हायटेक डिलाइटने ही नाविन्यपूर्ण वास्तू उभारली आहे. आजच्या तरुणांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनून इतरांनाही रोजगार द्यावा, असा आशीर्वाद कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी दिला.

हायटेक ग्रुपने सुरू केलेले हायटेक डिलाइट आगामी काळात शहराचा मानबिंदू ठरेल. दक्षिण भागात औद्योगिक वसाहत असल्याने बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी हे हॉटेल सोयीचे आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा आणि बेळगावकरांनी या सुंदर हॉटेलला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले.

हायटेक ग्रुपच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त हायटेक डिलाइट हे शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आणि लॉजिंग सुरू करण्यात आले आहे. टीव्हीएस, अशोक लेलँड, पियाजिओ, बॉश मल्टी टास्क सर्व्हिस आणि हायटेक ॲडव्हर्टायझर्सच्या माध्यमातून लाखो ग्राहक आमच्याशी जोडले गेले आहेत, असे विनयकुमार बाळिकाई यांनी सांगितले.

वाहनांच्या क्षेत्रानंतर आता आम्ही आदरातिथ्य क्षेत्रात पदार्पण केले आहे. या हॉटेलमध्ये २५ एसी रूम्स आणि कॉन्फरन्स रूमची सुविधा असून, हे हॉटेल पर्यटक आणि उद्योजकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास संचालक राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केला.

याच सोहळ्यात टीव्हीएस आर.टी.एक्स. (TVS RTX) या नवीन दुचाकीचे अनावरण करण्यात आले. या गाडीच्या आधुनिक फीचर्समुळे सुमारे १२० ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केली असून, पहिल्या ६ ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली.

बेळगावकरांच्या प्रेमामुळेच हायटेक ग्रुपने १५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. याच औचित्याने आम्ही लॉजिंग, रेस्टॉरंट आणि नवीन दुचाकीचे लाँचिंग केले असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया संचालक राजेश भोसगी यांनी व्यक्त केली.

हायटेक ग्रुपने आता आदरातिथ्य क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यांना यातही यश लाभो. टीव्हीएस आर.टी.एक्स. या नवीन दुचाकीचा पहिला ग्राहक होताना आनंद होत असल्याची भावना कुलदीप हंगीरगेकर यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी संचालक बसवराज तंगडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खानापूर रोडवरील तिसऱ्या रेल्वे गेटजवळील हायटेक डिलाइटला एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Tags: