Bailahongala

बेळवडी मल्लम्मा उत्सवातील कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अजयने मारली बाजी

Share

बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कन्नड व संस्कृती विभागाच्या वतीने आयोजित ‘बेळवडी मल्लम्मा उत्सव २०२६’ चा समारोप कुस्तीच्या भव्य आखाड्याने झाला. या स्पर्धेत देश-विदेशातील नामवंत मल्लांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले.

बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी येथे आयोजित या कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित पुरुष व महिला पैलवान सहभागी झाले होते. आखाड्यात पुरुष मल्लांच्या ३६ जोड्या, तर महिला मल्लांच्या ५ जोड्यांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. या कुस्त्यांनी उत्सवाच्या सांगता समारंभाची रंगत अधिकच वाढवली.

उपस्थितांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याच्या अजयने ब्राझीलच्या प्रडेल्ला लिमा याला पराभूत करून विजय मिळवला. महिलांच्या कुस्तीत महाराष्ट्राच्या सचिता मोरे हिने दुर्गा नायकवर मात केली. हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कुस्त्यांनी बेळवडीचा आखाडा गाजला.

Tags: