hubbali

आमचे खेळाडू टीम इंडियासाठी पात्र – मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला

Share

जम्मू आणि काश्मीरच्या संघाने क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. येथील प्रतिभा भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केले.

हुबळी विमानतळावर प्रथमच आगमन झाले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी क्रीडा आणि राजकारणाशी संबंधित विविध विषयांवर भाष्य केले.

प्रथमच जेतेपद पटकावण्याची संधी आमच्यासमोर असून यामुळे काश्मीरमधील क्रिकेटचे भविष्य बदलू शकते. आमच्याकडे दर्जेदार क्रिकेटपटू आहेत, हे आता जगाला समजेल. आतापर्यंत त्यांना योग्य व्यासपीठ आणि प्रसिद्धी मिळाली नव्हती. क्रिकेट हा असा खेळ आहे जो धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतो. या पवित्र रमजान महिन्यात आमचा संघ चषक जिंकूनच परत येईल, असा विश्वास उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. हुबळी भेटीबाबत आनंद व्यक्त करताना उमर अब्दुल्ला म्हणाले की, “मी हुबळीला येण्यासाठी खूप उत्सुक होतो. ही माझी या शहराला दिलेली पहिलीच भेट आहे.”

याच वेळी अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांच्या सुटकेचे स्वागत करत उमर अब्दुल्ला यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्यावरील गुन्हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित होते. न्यायालयाने या प्रकरणाची सखोल पडताळणी करून ‘निर्दोषत्वाचे तत्व’ जपले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: