Khanapur

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत अंजली निंबाळकर सहभागी

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केरळमधील कन्नूर येथे आयोजित काँग्रेसच्या विशेष पदयात्रेत सहभाग घेतला. आयएनसी पुडुचेरी आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय राजकारणात आपल्या संघटनात्मक कौशल्याने हायकमांडचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर सध्या काँग्रेसच्या विविध देशव्यापी मोहिमांमध्ये सक्रिय आहेत. पक्ष संघटन आणि बळकटीकरणासाठी केरळ तसेच पुडुचेरी सीमाभागात आयोजित या पदयात्रेत त्यांनी सहभाग नोंदवला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून डॉ. अंजली निंबाळकर त्यांना बळ देत आहेत.

Tags: