आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने, कर्नाटक राज्य वैद्यकीय अधिकारी संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.

आरोग्य विभागातील तांत्रिक पदे, महानगरपालिकांमधील वरिष्ठ पदे आणि अन्न सुरक्षा विभागातील जबाबदाऱ्या तांत्रिक ज्ञान नसलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. यामुळे कामकाजावर आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत असून या पदांवर विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी डॉक्टरांना कायम करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सेवा सुरक्षितता नसल्याने कंत्राटी कर्मचारी अस्वस्थ असून, त्यांना कायम करावे आणि त्यांच्या कंत्राटी सेवेचा विचार पेन्शनसाठी करावा, अशा शब्दांत संघटनेने आपल्या मागण्या मांडल्या आहेत.


Recent Comments