धारवाड शहराच्या बाहेरील सवदत्ती रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अष्टगी जिनिंग फॅक्टरीजवळ ही घटना उघडकीस आली असून धारवाड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सवदत्ती रस्त्यावरील झुडपामध्ये अर्धवट कपड्यांमधील एका महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही महिला धारवाड तालुक्यातील नरेन्द्र गावातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महिलेचा मृत्यू अपघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार ‘हिट अँड रन’ अपघाताचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून प्राथमिक तपासाचा अहवाल आल्यानंतरच या महिलेची ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे धारवाड ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments