कर्नाटक बालविकास अकादमीचे अध्यक्ष संगमेश बबलेश्वर यांनी बेळगाव दौऱ्यादरम्यान मच्छे येथील कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट दिली.


यावेळी त्यांनी हसत खेळात शिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा करताना बबलेश्वर यांनी त्यांना काही प्रश्न विचारले, ज्यावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. विद्यार्थ्यांची कलागुण पारखून त्यांनी मुलांकडून गाणीही ऐकली. मुलांमध्ये राहिल्याने आनंद मिळतो आणि मुले ही देवाचे रूप असतात, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान संगमेश बबलेश्वर यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेऊन शिक्षकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. शाळेत मुलांना स्वच्छ आणि पौष्टिक आहार मिळावा, तसेच शैक्षणिक वातावरण विद्यार्थीस्ನೆही असावे, याकडे विशेष लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments