बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आईस्क्रीम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत ५२ हजार विद्यार्थ्यांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले असून, गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आमदार अभय पाटील यांनी बेळगाव दक्षिणमधील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आईस्क्रीमचे वाटप केले. एलकेजीपासून दहावीपर्यंतच्या सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी शाळांमधील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या इतर गरजांबाबतही चर्चा करण्यात आली.
हा उपक्रम केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. सध्या या कार्यक्रमाचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.


Recent Comments