Chikkodi

केरूरच्या मळकारीसिद्धेश्वर-अरण्यसिद्धेश्वर यात्रेत भंडारा उधळण

Share

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात ‘भंडाऱ्याची यात्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील केरूर येथील श्री मळकारीसिद्धेश्वर-अरण्यसिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत आपले श्रद्धास्थान असलेल्या देवाप्रती भक्ती व्यक्त केली.

‘हंड कुदुरी, पुंड अरण्यसिद्धा चंगाभलो’ अशा भक्तांच्या जयघोषाने अवघा परिसर निनादून गेला होता. भंडारा यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्यात लाखो भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि गाव भंडाऱ्यात न्हाऊन निघाले होते.

चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र केरूर येथील श्री मळकारीसिद्धेश्वर-अरण्यसिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची गुरुवारी उत्साहात सांगता झाली. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील भंडाऱ्याची सर्वात मोठी यात्रा म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. गुरुवारी पार पडलेल्या निवाळकी, देववाणी, दुपारचा अभिषेक आणि पालखी सोहळ्यादरम्यान हजारो भाविक भंडाऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघाले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री मळकारीसिद्धेश्वर आणि श्री अरण्यसिद्धेश्वर देवाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.

Tags: