बेळगाव मध्ये कर्नाटक राज्योत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगणावर संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती होती. प्रसिद्ध पार्श्वगायक विजय प्रकाश आणि गायिका अनुराधा भट्ट यांनी यावेळी विविध चित्रपट गीते सादर केली. गाण्यांच्या सादरीकरणादरम्यान उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली, तर काही तरुणांनी गाण्यांच्या तालावर नृत्य केले.

तुमच्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ असून बेळगावातील हे प्रेम नेहमीच स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया गायक विजय प्रकाश यांनी व्यक्त केली. चाहत्यांच्या विनंतीनुसार त्यांनी काही विशेष गाणीही सादर केली.

यावेळी ‘कांतारा’ चित्रपटातील ‘सिंगारा सिरिये’ तसेच इतर अनेक लोकप्रिय गाणी सादर करण्यात आली. चित्रपट गीतांसोबतच काही जुन्या गाण्यांनाही यावेळी पसंती मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी लोकगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments