Belagavi

बेळगावात कँटोनमेंट बोर्ड शाळांचा ‘स्कूल एक्सलन्स पुरस्कार’ देऊन गौरव

Share

बेळगावातील शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत कँटोनमेंट बोर्डाच्या शाळांना यंदाचा प्रतिष्ठित ‘स्कूल एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कँटोनमेंट बोर्डाच्या प्रशासनाखाली १९२० सालापासून कार्यरत असलेल्या शाळांमध्ये सध्या १६०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व हायस्कूलसह ‘स्नेहालय’ या विशेष मुलांच्या शाळेचा समावेश आहे. या सर्व संस्थांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या विशेष कार्यक्रमात कँटोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माचलवार सुधाम हरिविजय यांना ‘स्कूल एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. “शैक्षणिक गुणवत्ता आणि समाजसेवेमध्ये कँटोनमेंट बोर्डाच्या संपूर्ण टीमने केलेले कार्य अभिमानास्पद आहे,” अशी भावना शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी व्यक्त केली. शांताई वृद्धाश्रमाच्या प्रशासकीय प्रमुख मारिया विजय मोरे आणि संचालक ॲलन विजय मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी कँटोनमेंट बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाला वृद्धाश्रमातील रहिवासी आणि मान्यवर उपस्थित होते. कँटोनमेंट बोर्ड शाळांचे ब्रँड ॲम्बेसेडर संतोष दरेकर यांनी या उपक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Tags: