मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे सध्या कर्नाटक राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. जोपर्यंत सत्तेचा हा संघर्ष संपत नाही, तोपर्यंत राज्याची स्थिती सुधारणार नाही, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद यांनी केली आहे.

धारवाड येथे पत्रकारांशी बोलताना अरविंद बेल्लद यांनी सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेले ट्विट हे थेट उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठीच होते आणि ही बाब त्यांनाही ठाऊक आहे, असे अरविंद बेल्लद यांनी नमूद केले.
शिरहट्टीचे आमदार लमाणी यांच्यावर झालेल्या लोकायुक्त कारवाईबाबत बोलताना त्यांनी राजकीय षडयंत्राचा संशय व्यक्त केला. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींची नैतिकता उच्च दर्जाची असायला हवी. या प्रकरणाची लोकायुक्त संस्थेने कोणत्याही दबावाशिवाय चौकशी करावी. दोषी असल्यास शिक्षा व्हावी, मात्र केवळ लक्ष्य करून धाडी टाकणे चुकीचे आहे, असे अरविंद बेल्लद यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा आरोप अरविंद बेल्लद यांनी केला.


Recent Comments