हुबळीतील केशवापूर पोलिसांनी एका आंतरजिल्हा दुचाकी चोराला अटक करण्यात यश मिळवले असून, त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरातील रहिवासी भरत श्यागोटी यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना केशवापूर पोलिसांनी सय्यद अली उर्फ हर्ष उर्फ हर्षवर्धन नदाफ या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १२ मौल्यवान दुचाकी जप्त केल्या आहेत.
आरोपीने या सर्व दुचाकी बेंगळुरू, बेळगाव आणि हुबळी या शहरांमधून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.


Recent Comments