KHANAPUR

डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी

Share

तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने एआयसीसी सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

एआयसीसी सचिव पदी नियुक्ती झाल्यापासून डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे काँग्रेस पक्षाने विविध राज्यांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आपल्या संघटनात्मक कौशल्याने राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवणाऱ्या डॉ. निंबाळकर यांच्याकडे सध्या तीन केंद्रशासित प्रदेश आणि एका राज्याचा कार्यभार आहे. यापूर्वी केरळ, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आता पुद्दुचेरीची ही नवी जबाबदारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (एआयसीसी) त्यांना दिली आहे.

Tags: