कागवाड मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून, त्यातील १८ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कागवाड मतदारसंघाच्या विशेष विकास कामांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ३६ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकासासाठी देण्यात आले असून, आज १८ कोटी रुपयांच्या कामांचे पूजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजू कागे यांनी दिली.
सोमवारी सकाळी शिरगुप्पी गावात शिरगुप्पी-मंगावती मार्गावरील रस्ते विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या कामाचे पूजन पार पडले.
या कार्यक्रमाला कागवाड काँग्रेस घटक अध्यक्ष विजय अकीवाटे, सुरेश चौगुले, महादेव पाटील, राजू चौगुले, अनिल चौगुले, गौंडी सय्यद, संदीप कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निपाणी-कोट्टलगी राज्य महामार्गावरील उगार-कुसनाळ दरम्यानच्या रस्ते विकासासाठी २ कोटी रुपयांच्या कामाचे पूजन संपन्न झाले. त्याचप्रमाणे ऐनापूर-शेडवाळ-शिरगुप्पी मार्गासाठी ४ कोटी, ऐनापूर-हुलगबाळी मार्गासाठी २ कोटी आणि मोळे-तंगडी दरम्यानच्या रस्ते विकासासाठी २.४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अशा एकूण १८ कोटींच्या कामांना आमदार राजू कागे यांनी चालना दिली.
उगार येथील समारंभात विपुुल पाटील, रजनीकांत शहा, डॉ. राजू पाटील, अण्णासाहेब खोत, भरतेश उपाध्ये, सुरेश समाजनावर आणि महेश कुसनाळे उपस्थित होते.
ऐनापूर येथील कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्या प्रेमलता रेड्डी, प्रवीण गाणीगेर, अरुण गाणीगेर, संजय बिरडी, प्रकाश कोरबू, डॉ. अरविंद कारची आणि संजू कुसनाळे उपस्थित होते. तसेच मोळे येथील सोहळ्यात विनोद कोळेकर, सिद्धप्पा कनाळ, बाळप्पा एरंडोले, हनुमंत बनचोड, सुरेश कोळेकर, धर्माजी कोळेकर, अशोक हुग्गी आणि कंत्राटदार परशुराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments