ARREST

बेळगावमध्ये गावठी दारूविक्रेत्यावर पोलिसांचा छापा

Share

बेळगाव शहरातील मारीहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मोदगा-सुभावी रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून पोलिसांनी बेकायदा साठा जप्त केला.

बेळगावमधील मोदगा येथील विठ्ठल हणबर लेआउट परिसरात अवैध गावठी दारूची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच मारीहाळ ठाण्याचे एएसआय जी. एस. दरूर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ५ लिटर गावठी दारूची अवैध विक्री करणाऱ्या आनंद अप्पय्या कलेरी या २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

अटकेतील आरोपीकडून बेकायदा दारूसाठा हस्तगत करण्यात आला असून, मारीहाळ पोलिस ठाण्यात अबकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. वेळेत छापा टाकून हा अवैध व्यवहार रोखणाऱ्या पथकाच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Tags: