Bagalkot

​बागलकोटमध्ये जिल्हा प्रशासनाने बोलावलेली शांतता समितीची बैठक निष्फळ

Share

​बागलकोटमधील तणाव निवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली शांतता बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे.

मुस्लिम समाजाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे संतापलेल्या हिंदू संघटनांनी बैठकीवर बहिष्कार टाकत काढता पाय घेतला. तसेच आज सायंकाळपर्यंत सर्व दोषींना अटक करण्याचा अल्टिमेटम प्रशासनाला दिला आहे.

​बागलकोट जिल्हाधिकारी कार्यालयात काल संध्याकाळी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हिंदू संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहिले, मात्र मुस्लिम समुदायाचे नेते गैरहजर राहिले. एका समुदायाच्या अनुपस्थितीत शांततेवर चर्चा करणे शक्य नाही, अशी भूमिका मांडत हिंदू कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोरच तीव्र नाराजी व्यक्त केली आणि बैठकीतून बाहेर पडले.

​या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, घटनेत सामील असलेल्या सर्व आरोपींना आज सायंकाळपर्यंत अटक करावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. अटकेची कारवाई न झाल्यास २२ फेब्रुवारी रोजी मोठी सभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशाराही आयोजकांनी दिला आहे.

शहरात सध्या कलम १४४ लागू असून परिस्थिती ‘धगधगत्या कोळशासारखी’ आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Tags: