बेळगावमधील क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरलेली ‘मुरुगेंद्रगौडा पाटील क्रिकेट टूर्नामेंट’ आता अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या या स्पर्धेचा महाअंतिम सामना उद्या रंगणार असून, संपूर्ण शहरात या सामन्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


युवा नेते मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्या वतीने आयोजित ‘२०२६ ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट’ स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. पांडुरंग आणि शेट्टी संघ यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. अखेर पांडुरंग संघ आणि साईराज स्पोर्ट्स संघ यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता ऐतिहासिक सरदार मैदानावर या दोन तगड्या संघांमध्ये ट्रॉफीसाठी झुंज पाहायला मिळणार आहे.

गेल्या १० दिवसांपासून सरदार मैदानावर सुरू असलेल्या या क्रिकेट महोत्सवात उद्या दोन महत्त्वाचे सामने होणार आहेत. बेळगावच्या क्रिकेटप्रेमींनी आतापर्यंत या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला असून, उद्या अंतिम सामन्यासाठीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी केले आहे.

मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही भव्य स्पर्धा आयोजित केली आहे. आजचा उपांत्य फेरीचा सामना खरोखरच अंगावर शहारे आणणारा होता. क्रीडा क्षेत्राला सातत्याने पाठबळ देणाऱ्या मुरुगेंद्रगौडा पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डीसीसी बँकेचे संचालक मल्लाप्पा यादवाड यांनी केले.

माजी शशिकांत पाटील ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून बेळगावमध्ये प्रथमच तरुणांना इतके मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे राज्य आणि आंतरराज्यीय खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असून, बेळगावमध्ये राष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी मुरुगेंद्रगौडा पाटील यांचे योगदान अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
आजच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Recent Comments